मूकबधीर तरूणीवर बलात्कार

पिंपरी चिंचवडमध्ये एका १८ वर्षीय मुकबधीर तरुणीवर शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Updated: Mar 27, 2015, 09:06 PM IST
मूकबधीर तरूणीवर बलात्कार title=

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये एका १८ वर्षीय मुकबधीर तरुणीवर शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

ही मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केलीय. पीडीत मुकबधीर मुलीची आई, वडील आणि भाऊ कामासाठी सकाळीच बाहेर पडायचे. 

पीडित मुलगी शाळेतून घरी येताच तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, १७ वर्षीय मुलाने तिच्यावर गेल्या डिसेंबर महिन्यापासून अनेकदा बलात्कार केला. मुलीला त्रास होऊ लागल्यान तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती दोन महिन्याची गरोदर असल्याच स्पष्ट झालं आणि त्यानंतर झालेला प्रकार समोर आला… 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.