मुंबई : मुंबईनजिकच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मृत डॉल्फिन मासा सापडलाय. यामुळे समुद्रजीवांना निर्माण झालेल्या धोक्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय.
वसई नजिकच्या भोईगाव समुद्र किनाऱ्यावर गावकऱ्यांना बुधवारी सकाळी हा मृत डॉल्फिन आढळलाय. त्यानंतर वनाधिकाऱ्यांना ही बातमी समजली.
या डॉल्फिनचा मृत्यू का झाला असावा? याबद्दल अजूनही शोध सुरू आहे. परंतु, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या डॉल्फिनच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसत होत्या.
उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वीच व्हेल माशांचे थवे ओडिशाच्या समुद्रातून वाहून येऊन मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सापडले होते... यातील काही जिवंत होते तर बरेचसे मृतही झालेले आढळले होते.