जळगाव : (विकास भदाणे, झी २४ तास) जळगावातील शेकडो केळी उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर उतरले होते. हवामानावर आधारीत फळपिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
जळगाव-इंदूर हा महामार्ग शेतकऱ्यांरी रोखून धरला होता, त्यामुळे वाहतुक दुतर्फा खोळबंली होती. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या फळ-पिकविम्याचे पैसे न भरल्यामुळे १२ हजार शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित राहावं लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पिकविम्याचा तातडीने लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.