सांगली: सांगलीत कृष्णा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या १३ वर्षाच्या अजय यादव या मुलावर मगरीनं हल्ला केला. या मुलाला मगरीनं नदीत ओढून नेलं.
हा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी पाहिला आणि लगेचच पोलिस आणि वनाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पोलीस आणि वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मुलाला शोधण्याचं काम सुरू आहे.
कृष्णानदीपात्रात मगरीचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय आहे. या परिसरातील हा तिसरा हल्ला आहे. दरम्यान, अजूनही मुलाचा काही शोध लागला नाहीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.