ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि भा देशपांडे यांचं दीर्घ आजारानं निधन

ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि भा देशपांडे यांचं दीर्घ आजारानं राहत्या घरी निधन झालंय. ते 79 वर्षांचे होते. 

Updated: Mar 9, 2017, 11:58 AM IST
ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि भा देशपांडे यांचं दीर्घ आजारानं निधन  title=

पुणे : ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि भा देशपांडे यांचं दीर्घ आजारानं राहत्या घरी निधन झालंय. ते 79 वर्षांचे होते. 

डॉ. वि भा देशपांडे अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. पुण्यातल्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. 

विभांचं बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. त्यांनी 'मराठी नाट्यकोष' या जवळजवळ 1200 पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी वाड्मय कोषात एक मोलाची भर टाकलीय. त्यांचे 2015 सालापर्यंत तब्बल 51 पुस्तके प्रकाशित झालीत. 
 
गुरुवारी सायंकाळी 4.00 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.