पुणे : सरत्या वर्षात पुण्यातील गुन्हेगारीत सात टक्क्यांची वाढ झालीय. मात्र त्याचवेळी शहरातल्या गंभीर गुन्ह्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटलंय.
पुणे शहरातल्या गुन्हेगारी तसंच पोलिसांच्या कामगिरीचा आढावा पोलीस आयुक्तांनी मांडला. विशेष म्हणजे खून, दरोडा यासह चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट नोंदवण्यात आलीय. मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचं स्पष्ट झालंय.