नागपूर : नागपूरमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. लकडगंज परिसरात भाऊराव नगरात ही घटना घडलीये.
दीपिका सिंह(१८ वर्षे) आणि सोनू शेख(२२ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दीपिकाच्या राहत्या घरी या दोघांनी गळफास घेत आपले जीवन संपवले.
दरम्यान, या दोघांनी हे अखेरचे पाऊल का उचलले या मागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे.