आयुक्त तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत पुन्हा दणका, स्थायी समिती अध्यक्षांचे नगरसेवक पद रद्द

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांची पदे रद्द केलीत. त्यामुळे मुंढे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्यांना पुन्हा दणका बसला आहे.

Updated: Nov 18, 2016, 07:21 PM IST
आयुक्त तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत पुन्हा दणका, स्थायी समिती अध्यक्षांचे नगरसेवक पद रद्द title=

नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांची पदे रद्द केलीत. त्यामुळे मुंढे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्यांना पुन्हा दणका बसला आहे.

शिवसेनेचे शिवराम पाटील आणि अनिता पाटील यांचे नगरसवेक पद रद्द झाली आहेत. शिवराम पाटील हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे मुंढेविरोधात आक्रमक होणाऱ्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. अनधिकृत बांधकाम केल्याने पाटील दाम्पत्यांना आपली पद्दे गमवावी लागली आहेत.

शिवराम पाटील यांच्या कोपरखैराणे इथल्या हॉटेलच्या बांधकामात अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईनंतर शिवसेना आणि मुंढे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. शिवराम पाटील हे वॉर्ड क्रमांक 40 मधील तर अनिता पाटील या वॉर्ड क्रमांक 39 मधील नगरसेवक आहेत.