नागपूर : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस आज नागपुरातल्या टोलनाक्यांविरोधात आंदोलन पुकारले. टोलनाक्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्तारोको केला.
शोभा फडणवीस यांनी मनसर आणि बोरखेडी टोलनाक्यांविरोधात आंदोलन पुकारले. या टोलनाक्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचं संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केलाय. टोल विरोधात एकूणच वातावरण तापले असताना, भाजपा आमदार आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यानीटोल बंद आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी आज आंदोलन केले.
आपले आंदोलन शासनाच्या विरोधात नसून, सरकारच्या मदतीकरिता आहे, अशी भूमिका शोभाताई फडणवीस यांनी घेतली. या नाक्यावरिल आर्थिक गैर प्रकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिले असल्याचे त्या म्हणाल्यात. ओरियंटल कंपनीच्या मालकीचा हे दोन्ही टोल नाके असून माजी केंद्रीय मंत्री कमल नाथ यांचे राजकीय संरक्षण याला प्राप्त असल्याचा आरोप त्यांनी लावला.
या दोन्ही टोल नाक्यांची चौकशी करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले पाहिजेत. प्रकल्पाचे पैसे, व्याज सगळे काही कंपनीने मिळवले असून आता टोल नाका बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या कंपनीने करार सातत्याने मोडीत काढत दोन ऐवजी चार ठिकाणी नाके बसविलेत. इतर अनेक पद्धतीने सुद्धा जनता आणि शासन यांची फसवणूक या कंपनीने केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
शोभाताई या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत. मुख्यमंत्र्यांना सुद्धा या आंदोलनाबाबत सर्व माहिती दिली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.