पोलिस भरतीवेळी उंची वाढविण्यासाठी 'पायचलाखी'

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 29, 2017, 08:09 PM IST
पोलिस भरतीवेळी उंची वाढविण्यासाठी 'पायचलाखी' title=

औरंगाबाद : पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं.

औरंगाबादमध्ये सध्या ग्रामीण विभागाची पोलीस भरती सुरु आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना एका उमेदवाराच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

पोलिसांनी या तरुणाची तपासणी केली, यावेळी पायाला नाणं लावून उंची वाढवल्याची बाब उघड झाली आहे.  मात्र या प्रकरणी औरंगबाद पोलीस ने कुठलाही गुन्हा दाखल न करता उमेदवार च्या भविष्याचा विचार करीत त्याला समज देऊन निवड प्रक्रियेतून बाद केले आहे.