कोल्हापूर : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात देवस्थान समितीनं दानपेट्यांवर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये दान करु नका असं आवाहन केलंय.
महालक्ष्मी मंदिरामध्ये एकूण १५ दानपेट्या आहेत. या १५ ही दानपेट्यांवर अशा प्रकारचे स्टिकर लावण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या दानपेट्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे.