लाचप्रकरणी माझा काहीही संबंध नाही - सुहास खामकर

या लाचप्रकरणी माझा काहीही संबंध नाही. मला यात अडकविण्यात आले आहे, असे सांगून आपल्यावरील आरोप शरीरसौष्ठव पटू  आणि नायब तहसीलदार सुहास खामकर यांनी फेटाळले आहेत.

Updated: Aug 5, 2014, 12:31 PM IST
लाचप्रकरणी माझा काहीही संबंध नाही - सुहास खामकर title=

नवी मुंबई : या लाचप्रकरणी माझा काहीही संबंध नाही. मला यात अडकविण्यात आले आहे, असे सांगून आपल्यावरील आरोप शरीरसौष्ठव पटू  आणि नायब तहसीलदार सुहास खामकर यांनी फेटाळले आहेत.

मी लाच घेतलेली नाही. या लाचखोरी प्रकरणाशी माझा संबंध नाही. हे माझ्याविरोधातील षडयंत्र असून यामध्ये मला गोवण्यात आलंय. माझ्याबाबत प्रसारमाध्यमातील लाच घेतल्याचं वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण  सुहास खामकर यांने केलेय. 

मी आतापर्यंत देशासाठी खेळलो आहे आणि पुढेही खेळेन. अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये फसवून मी संपेन असे अनेकांना वाटेत असेल मात्र हे चुकीचं आहे. यापुढे मी अधिक जोमाने काम करीन, असंही सुहासने स्पष्ट केलं.

पनवेलचा नायब तहसीलदार म्हणून काम करणाऱ्या सुहास खामकरला काल ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. सातबारा उताऱ्यात नाव टाकण्यासाठी एका शेतकऱ्याकडे एक लाखांची लाच मागितली. ही लाच एका लिपिकीद्वारे घेतल्याचा आरोप सुहास खामकर यांच्यावर ठेवण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.