Rohit Sharma: 19 नोव्हेंबर 2023 रोजी टीम इंडियाचा वनडे वर्ल्डकपमध्ये पराभव झाला आणि भारतीयांनी मन दुखावली गेली. मात्र अवघ्या 7 महिन्यांमध्ये रोहित शर्माने भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. या विजयामध्ये अनेक खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला. दरम्यान विश्वविजेता झाल्याचं समजताच टीम इंडियाच्या खेळाडूंच्या काय रिएक्शन होत्या ते पाहूयात.
टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 रन्सने पराभव केला. या सामन्यात भारताकडून शेवटची ओव्हर हार्दिक पंड्याने टाकली. या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 16 रन्सची आवश्यकता होती. या ओव्हरच्या 5 बॉल्समध्ये 7 रन्स दक्षिण आफ्रिकेने केले. यावेळी शेवटच्या बॉलवर फलंदाजाला केवळ एक रन घेता आला आणि टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये विजय झाला. यावेळी मैदानावर अतिशय भावूक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या अगदी लहान मुलांप्रमाणे रडताना दिसले.
हार्दिक पांड्याने 20 व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकताच भारताचा विजय झाला आणि रोहित जमिनीवर झोपला. या विजयाने तो इतका भावूक झाला होता की, त्याने मैदानावर जोरदार फटकेबाजी सुरू केली. गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या लहान मुलासारखे अश्रू ढाळू लागला. प्लेईंग 11 मध्ये नसलेला मोहम्मद सिराजला देखील अश्रू अनावर झाले होते.
Us rohit bhai us pic.twitter.com/p8bu08wMGl
— Manu Arora (@mannupaaji) June 29, 2024
Who’s say men Don’t cry #T20IWorldCup #INDvsSA #viratkholi #RohitSharma #HardikPandya
Retweet for our Champions pic.twitter.com/ZgqxhU7sap
— Yash Patel (@patelsaheb2611) June 29, 2024
T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा खूप भावूक झाला होता. भर मैदानात त्याला त्याचे अश्रू यावेळी लपवता आले नाही. त्यानंतर यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल आणि संजू सॅमसनने त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीही खूप भावूक झाला होता. रोहित शर्मासोबत तो रडतानाही दिसला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. भारतीय कर्णधार इतका आनंदी झाला की, त्याने हार्दिक पांड्याच्या लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये प्रवेश करत त्याचं चुंबन घेतलं.
T20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. हेनरिक क्लासेनने अक्षर पटेलच्या ओव्हरमध्ये 24 रन्स केले. यानंतर हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 30 चेंडूत फक्त 28 रन्सची गरज होती. त्यानंतर 16व्या षटकात जसप्रीत बुमराहने केवळ 4 रन्स दिले आणि 17व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने क्लासेनची विकेट घेत सामन्याचं रूपचं पालटलं. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. तीन ओव्हर्समध्ये केवळ 10 रन्स देत 2 विकेट्सही घेतले. अखेरीस टीम इंडियाचा 7 रन्सने वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात विजय झाला.