सातारा : दिल्लीतल्या भाजपच्या पराभवाचे जोरदार पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. निवडणुकीत भाजपसोबत असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना ही साथ सोडण्याच्या विचारात आहे.
मार्चमध्ये पुण्यामध्ये कार्यकारणीची बैठक बोलावण्यात आली असून यावेळी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. सत्ताधारी पक्षासोबत असून स्वाभिमानी पक्ष आंदोलनं करतोय. यामुळे पक्षावर टीका होतेय.
मंत्रीपदांसाठी पक्ष आंदोलन करत असल्याची विरोधकांनी टीका केली आहे. त्यामुळे या पक्षाची पुरती गोची झाली आहे. हे टाळण्यासाठी महायुतीतूनच बाहेर पडण्याच्या मानसिकतेत स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्याचं समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.