मतदानाबद्दल दानवेंचे खळबळजनक वक्तव्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मतदानबद्दल केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडवून दिलीय. 

Updated: Jan 13, 2016, 02:34 PM IST
मतदानाबद्दल दानवेंचे खळबळजनक वक्तव्य title=

डोंबिवली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मतदानबद्दल केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडवून दिलीय. 
 
बाबासाहेब आंबेडकरांनी एकाला एकच मत देण्याचा अधिकार दिला. पण आम्ही एकदा नव्हे अनेकदा मतदान करायचो असा खळबळजनक गौप्यस्फोट दानवेंनी केलाय. 
 
शहरात राहणारे मराठवाडा आणि विदर्भातले लोक एक मत शिवसेनेला देतात...त्यानंतर गावी जाऊन दुसरं मत भाजपला देतात असं दानवेंचं म्हणणं आहे. काल डोंबिवलीत बोलताना दानवेंनी हे विधान केलंय.