मुंबई : ठाण्यातील सह पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांची बदली होऊ नये म्हणून ठाणेकरांकडून दबाव होता. मात्र, लक्ष्मी नारायण यांची राज्य पोलीस दलातील प्रशासकीय विभागात बढतीवर बदली करण्यात आलेय.
लक्ष्मी नारायण यांच्या जागी आशुतोष डुंबरे यांची सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालीये. दरम्यान बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरण लक्ष्मी नारायण यांना भोवलं अशी चर्चा आहे.
या प्रकरणत राजकीय दबाव झुगारुन लक्ष्मी नारायण यांनी कडक भूमिका घेतली होती. तपासाअंती चार आरोपी नगरसेवकांना अटक झाली. ठाण्यातील सर्वच स्तरातून त्यांच्या बदलीला विरोध होत आहे. अल्पावधीत त्यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करुन ठाणे सुरक्षित केले, असं ठाणेकरांचं म्हणणं आहे. मात्र, तरीही राजकीय दबाव वापरुन त्यांची बदली केल्याचे म्हटले जात आहे.