नागपूर : नागपूरचा फरार भाजप पदाधिकारी सुमित ठाकूरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. अमरावतीमधल्या धामणगाव रेल्वे इथून नागपूर क्राईम ब्रान्चनं त्याला अटक केलीय.
कार पार्किंगच्या वादातून ठाकूर यानं प्राध्यापक म्हस्केंना घरात घुसून मारहाण केली होती. त्यानंतर या प्राध्यापकांची घराबाहेर उभी असलेली कार पेटवून देण्यात आली होती... या गावगुंडाची दहशत आणि पोलिसांचा नाकर्तेपणा यामुळे प्राध्यापक म्हस्केंना घर सोडावं लागलं होतं.
अधिक वाचा - 'भाजप'च्या गावगुंडानं प्राध्यापकाची गाडी जाळली
'पोलिसांत तक्रार केली तर सोडणार नाही' अशी धमकी सुमित ठाकूरनं प्राध्यापक म्हस्के यांना दिली होती. त्यानंतर म्हस्के यांना पोलीस संरक्षणही देण्यात आलं होतं. दोन पोलीस शिपाई घरात असतानाही सुमित ठाकूर आणि त्याच्या भावानं काही गुंडांसोबत म्हस्के यांच्या घराबाहेर पार्क केलेली कार जाळली होती.
अधिक वाचा - नागपुरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या अमित ठाकूरला शिर्डीतून अटक
दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी पोलिसांनी ठाकूरचा भाऊ अमित ठाकूरला अटक केली होती. मात्र गेल्या 17 दिवसांपासून सुमित ठाकूर पोलिसांना गुंगारा देत होता.
अखेर पोलिसांनी मुजोर सुमित ठाकूरला अटक करुन बेड्या ठोकल्यात. ठाकूर बंधूंच्या अटकेनंतर नागपूरमधल्या गुंडगिरीला चाप बसणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.