लातूरमध्ये नगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत

जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी साडेनऊपर्यंत चारही ठिकाणी सरासरी 13 ते 14 टक्के मतदान झालं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू रहाणार आहे. काही मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र दिसून येत होते.

Updated: Dec 14, 2016, 12:53 PM IST
लातूरमध्ये नगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत  title=

लातूर : जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी साडेनऊपर्यंत चारही ठिकाणी सरासरी 13 ते 14 टक्के मतदान झालं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू रहाणार आहे. काही मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र दिसून येत होते.

चार नागरपालिकातील ०४ नगराध्यक्ष आणि ५० प्रभागातील १०१ नगरसेवकांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होत आहे. या चारही पालिकेतील मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १४१५ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त या निवडणुकीसाठी ठेवण्यात आला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम, बहुजन विकास आघाडी आदींसह अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. दरम्यान उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि औसा शहरातील मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.