'भूमाता'च्या ७०० महिला आंदोलक मंगल कार्यालयात

आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भूमात ब्रिगेडच्या आंदोलक महिला अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण, त्यांना तुरुंगात नाही तर एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय. 

Updated: Jan 27, 2016, 09:43 AM IST
'भूमाता'च्या ७०० महिला आंदोलक मंगल कार्यालयात title=

शनी शिंगणपूर : आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भूमात ब्रिगेडच्या आंदोलक महिला अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण, त्यांना तुरुंगात नाही तर एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय. 

या महिलांना पुणे-नगर हायवेवरील सफलता मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय. सुमारे सहाशे ते सातशे महिला आंदोलक असल्यामुळं जागेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं त्यांना मंगल कार्यालयातच ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

'आमच्या परंपरेचा सन्मान झाला'

भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी परत पाठवल्यानं शनि शिंगणापुरमध्ये महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. आमच्या परंपरेचा सन्मान झाला अशा शब्दात गावक-यांनी आनंद व्यक्त केलाय.

मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका

'भारतीय परंपरेत आणि हिंदु धर्मात स्त्रियांना उपासनेचे स्वातंत्र्य नेहमीच राहीले आहे.प्रथा परंपरांमध्ये कालसापेक्ष बदल हिच आमची संस्कृती आहे. ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव हि आमची संस्कृती नाही. मंदीर प्रशासनाने पुढाकार घेवून चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडविले पाहिजेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक,नगर यांना सुचना दिल्या आहेत की संघर्ष टाळून संवाद प्रस्तापित करावा. समाजातील अग्रजांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा' असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.