पुणे आरटीओमधील एजंटांचा विळखा अखेर उठला

 पुणे आरटीओला पडलेला एजंटांचा विळखा अखेर उठलाय.'झी मीडिया'नं याबाबत स्टिंग ऑपरेशन करून आरटीओमधला एजंटांचा वावर दाखवला होता.

Updated: Jan 17, 2015, 11:45 PM IST
पुणे आरटीओमधील एजंटांचा विळखा अखेर उठला title=

पुणे : पुणे आरटीओला पडलेला एजंटांचा विळखा अखेर उठलाय.'झी मीडिया'नं याबाबत स्टिंग ऑपरेशन करून आरटीओमधला एजंटांचा वावर दाखवला होता.

परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानंतरही सुरू असलेला हा प्रकार आम्ही उघड केला. त्यानंतर आता पुणे आरटीओ एजंटांच्या कचाट्यातून मोकळं झाले आहे.दरम्यान, RTO एजंटनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना चांगली सेवा देण्याची क्षमता RTOमध्ये नाही, एजंट त्यांना मदत करू शकतात, असा त्यांचा दावा आहे.

पुण्यातील आरटीओ कार्यालय एजंटच्या विळख्यात अशी बातमी 'झी २४ तास'ने प्रसारित केली होती. याची दखल आरटीओ प्रशासनाने तात्काळ घेतली.परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी याप्रश्न लक्ष घालून अधिकाऱ्यांना एजंटगिरीला चाप लावण्यासाठी अमलबजावणी करण्यात भाग पाडले.

'आरटीओ' एजंटच्या विळख्यातून मुक्त होईल, अशी माहिती महेश झगडे यांनी दोन दिवासांपूर्वीच दिली होती. याबाबत त्यांनी 'आरटीओमधून एजंट्सना हद्दपार करा असं फर्मान परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सोडले होते. तरीही पुणे येथे एजंटचा विळखा कायम होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंत यंत्रणा कामाला लागली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.