औरंगाबाद-डून हाँगमध्ये 'सिस्टर सिटी' करार - मुख्यमंत्री

औरंगाबाद आणि डून हाँग या दोन शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’करारावर स्वाक्षरी झाली आहे. या कराराचा आनंद होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीजिंग इथं सांगितलंय. 

Updated: May 16, 2015, 10:26 AM IST
औरंगाबाद-डून हाँगमध्ये 'सिस्टर सिटी' करार - मुख्यमंत्री title=

बीजिंग : औरंगाबाद आणि डून हाँग या दोन शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’करारावर स्वाक्षरी झाली आहे. या कराराचा आनंद होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीजिंग इथं सांगितलंय. 

औरंगाबाद आणि डून हाँग या दोन शहरांमध्ये अनेक सांस्कृतिक समानता आहेत. चौथ्या शतकात बौद्ध भिख्खूंनी औरंगाबाद शहराशेजारील अजिंठा गुंफेत कोरलेल्या बुद्ध मूर्ती आणि डून हाँग येथील मोगाओ गुंफा यांच्यामध्ये बरेच साम्य आहे. 

राज्य पातळीवर अशा प्रकारचे सहकार्य वाढल्याने महाराष्ट्राला अधिक संधी तर मिळतीलच. त्याचबरोबर परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत होतील. चीनमध्ये आयोजित राज्यस्तरीय नेत्यांच्या फोरममध्ये मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.