औरंगाबाद पोलिसांकडून क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश, ७ ठिकाणी छापे

औरंगाबाद पोलिसांनी किक्रेट मॅचवर बेटींग करणारं मोठं रँकेट उघडकीस आणलं आहे. गुरुवारी संध्याकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत तब्बल ७ ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केलाय. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.. तर ६० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या रँकेटची पाळमुळं थेट दिल्ली मुंबईपर्यंत असण्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

Updated: May 15, 2015, 10:49 PM IST
औरंगाबाद पोलिसांकडून क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश, ७ ठिकाणी छापे title=

औरंगाबाद: औरंगाबाद पोलिसांनी किक्रेट मॅचवर बेटींग करणारं मोठं रँकेट उघडकीस आणलं आहे. गुरुवारी संध्याकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत तब्बल ७ ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केलाय. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.. तर ६० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या रँकेटची पाळमुळं थेट दिल्ली मुंबईपर्यंत असण्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

औरंगाबादहून मॅचवर सट्टा लावणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय.  गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची मॅच होती. त्यावर कोट्यवधींच्या सट्ट्याची उलाढाल सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत ७ पथकं बनवली आणि शहरातल्या वेगवेगळ्या ७ ठिकाणी छापे टाकून सट्टेबाजीचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी सट्टेबाजीप्रकरणी ६ जणांना अटक केलीय. तसंच ६ लाख रोख, १९० मोबाईल्स असा तब्बल ५५ लाखांचा ऐवजही जप्त केला. 

सट्टेबाजांनी औरंगाबादेत एका घरात जणू मिनी टेलिफोन एक्सचेंजच सुरु केलं होतं. त्यांची काम करण्याची पद्धत पाहून पोलीसही थक्क झाले. एका लाकडी बॉक्स मध्ये टेलिफोन एक्सचेंज सारखा प्रकार बनवण्यात आला होता .आणि त्याद्वारे हे बुकी राज्यात आणि राज्याबाहेरही बोलत होते. तब्बल २८ टेलिफोन्स लाईन यासाठी वापरण्यात येत होत्या. 

या सट्टेबाजांची लिंक परराज्यात असल्याचाही पोलिसांना संशय आहे. गुडगाव, दिल्ली आणि मुंबईतही धागेदोरे सापडण्याची शक्यताय. 

सट्टेबाजीप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी शहरातले प्रतिष्ठित व्यापारी आहेत. व्यापाऱ्याच्या माध्यमातून त्यांचा सट्टेबाजीचाही व्यवसाय चालत असल्याचं आता उघडकीस आलंय. त्यामुळे याप्रकरणी आणखी एखादा घोळ समोर येणार यात शंका नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.