नोटबंदीपूर्वी भाजपने आपला काळा पैसा केला पांढरा - अशोक चव्हाण

नोटबंदीआधी भाजपनं आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील अकोट येथे गवळीपुरा भागातील प्रचारसभेत बोलत होतेय. यावेळी खासदार हूसेन दलवाई यांनी नरेंद्र मोदींवर जहरी टिका करीत त्यांचा उल्लेख 'सैतान', अदानी-अंबानींचा 'दलाल' असा उल्लेख केलाय.

Updated: Nov 25, 2016, 11:43 PM IST
नोटबंदीपूर्वी भाजपने आपला काळा पैसा केला पांढरा - अशोक चव्हाण title=

जयेश जगड, झी मीडीया, अकोला : नोटबंदीआधी भाजपनं आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील अकोट येथे गवळीपुरा भागातील प्रचारसभेत बोलत होतेय. यावेळी खासदार हूसेन दलवाई यांनी नरेंद्र मोदींवर जहरी टिका करीत त्यांचा उल्लेख 'सैतान', अदानी-अंबानींचा 'दलाल' असा उल्लेख केलाय.

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आले होतेय. अकोटातील गवळीपुरा भागात झालेल्या या  प्रचारसभेत अशोक चव्हाणांनी मोदींवर जोरदार टिका केलीय. नोटबंदीआधी भाजपनं आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप यावेळी चव्हाण यांनी केलाय. 

सहा महिन्यांआधी नोटबंदीची बातमी येतेच कशी?, असा सवाल चव्हाण यांनी केलाय. नोटबंदीआधी भाजपने बिहारमध्ये खरेदी केलेल्या जमिनीवरही चव्हाणांनी प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान, शिवसेनेवर टीका करतांना चव्हाण यांनी पंतप्रधानांच्या सेना खासदारांसोबत झालेल्या भेटीवर टीका केलीय. पंतप्रधानांनी शिवसेनेला वर पाठविण्याची तयारी केल्याचं म्हटलंय. दरम्यान, शिवसेनेवर दुटप्पीपणाचा आरोप करतांना, सेनेला सत्ताही सोडायची नाहीय अन विरोधही करायचा आहे.

याच सभेला काँग्रेस नेते आणि खासदार हुसेन दलवाई उपस्थित होतेय. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. दुसऱ्याच्या पैशाने कपडे घेणारा देशाचं काय भलं करणार असा सवाल खासदार हूसेन दलवाई यांनी केलाय. 

स्वत:च्या बायकोला न्याय न देणारा जनतेला काय न्याय देणार असा सवाल दलवाई यांनी केलाय. जनतेनं सैतानाला देशाच्या सत्तेवर बसविल्याचं खासदार दलवाई म्हणाले. अदानी-अंबानींचा दलाल देशाचा पंतप्रधान झाल्याचं सांगत दलवाई यांनी मोदींवर टीका केलीय.