साताऱ्यामध्ये मोदी पेढेवाले, उदयनराजे पंतप्रधानांवर बरसले

नोटबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले आहेत.

Updated: Nov 25, 2016, 10:58 PM IST
साताऱ्यामध्ये मोदी पेढेवाले, उदयनराजे पंतप्रधानांवर बरसले title=

सातारा : नोटबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले आहेत. मोदी एवढे मोठे कोण लागून गेले, साताऱ्यामध्ये मोदी पेढेवाले आहेत, अशा शब्दांमध्ये उदयनराजेंनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. भाजपचे आमदार आणि खासदार का गप्प आहेत असा सवालही उदयनराजेंनी विचारला आहे.

समाजामुळे तुम्ही आणि आम्ही आहोत एका व्यक्तीमुळे समाज नाही हे मोदींनी लक्षात ठेवावं असंही उदयनराजे म्हणाले आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आज विविध मान्यवरांनी कराड येथे प्रितीसंगम येथील समाधी स्थळावर आदरांजली वाहिली. यावेळी उदयनराजेंनी पंतप्रधानांवर टीका केली.