मराठीचा गौरव : अरुण साधूंना जनस्थानचं 'सिंहासन'!

मराठी साहित्यात मानाचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कार  जेष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

Updated: Feb 27, 2015, 07:56 PM IST
मराठीचा गौरव : अरुण साधूंना जनस्थानचं 'सिंहासन'! title=

नाशिक : मराठी साहित्यात मानाचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कार  जेष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
 
१ लाख रुपये आणि सन्मान  चिन्हं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. दोन वर्षातून एकदा दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे साधू हे तेरावे मानकरी आहेत.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षाकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मात्र पंरपरेला फाटा देत यंदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यापूर्वी विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत अशा दिग्गजांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. साठच्या दशकात पत्रकारीतेपासून सुरुवात करणाऱ्या साधूंनी स्तंभलेखन, कादंबरी, विज्ञान, इतिहास अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी केली.

नागपुरात झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यावेळी झालेल्या भाषणात साधूंनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच स्वतंत्र विदर्भाला विरोध दर्शवला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.