ठाणे : मिरा-भाईंदर महानगरपालिकेत कमळ फुललं आहे. भाजपच्या गीता जैन महापौरपदी निवडून आल्यात तर शिवसेनेचे प्रवीण पाटील उपमहापौरपदी विराजमान झालेत.
यापूर्वी ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. महापौरपदाच्या निवडणुकीत गीता जैन यांना ४८ मतं मिळाली. तर माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची कन्या कॅथलीन परेरा यांना ४१ मते मिळाली. तर उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेचे प्रवीण पाटील यांना ४८ मते मिळाली.
काँग्रेसचे आमदार मुज्जफर हुसैन यांच्या आई नूरजहाँ हुसैन यांना ४१ मते मिळाली. मतदानप्रक्रियेत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. हे वर्चस्व भाजपने मोडीत काढले. शिवसेना-भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचा मिरा-भाईंदर येथे काहीही परिणाम झालेला नसल्याचे या विजयावरून दिसून आला. युतीची सत्ता पालिकेत आल्याने युतीच्या गोठात आनंदी वातावरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.