अजिंक्य रहाणे साईंच्या दर्शनाला

​टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणेनं सपत्नीक साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Updated: Apr 5, 2016, 11:04 PM IST
अजिंक्य रहाणे साईंच्या दर्शनाला title=

शिर्डी : ​टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणेनं सपत्नीक साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं.

अचानक साई मंदीरात दर्शनासाठी आलेल्या या अहमदगर जिल्ह्यातील सुपुत्राला पाहाण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. 

तर दुसरीकडे शिर्डीच्या साईबाबांना सोने, चांदीचे आभूषण दान करण्याचा भक्तांचा ओघ सुरु आहे. पुण्यातील डॉ. निलिमा सिन्हा या साईभक्त परिवारानं साईबाबांना 265 ग्रॅम वजनाचा सुवर्ण हार साई चरणी अर्पण केलाय. या हाराची किंमत 10 लाख रुपये असल्याचं साई संस्थान कडून सांगण्यात आलंय.

शिर्डी साईबाबा मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी सिन्हा या साई भक्त परिवाराचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केले​ आहे​.