माळेगाव साखर कारखाना पराभवानंतर अजित दादांच्या प्रचार सभा

 भाजपच्या नेत्यांना अलीकडे वेड लागलंय की काय हे समजेना.. कुणीही काहीही बोलतंय अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतलाय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आयेंगे असं गाजर दाखवणारे पंतप्रधान परदेश दौऱ्यात व्यस्त असून त्यांचाच कित्ता आता मुख्यमंत्र्यांनीही गिरवायला सुरुवात केलीय, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय. 

Updated: Apr 10, 2015, 06:04 PM IST
माळेगाव साखर कारखाना पराभवानंतर अजित दादांच्या प्रचार सभा title=

बारामती:  भाजपच्या नेत्यांना अलीकडे वेड लागलंय की काय हे समजेना.. कुणीही काहीही बोलतंय अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतलाय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आयेंगे असं गाजर दाखवणारे पंतप्रधान परदेश दौऱ्यात व्यस्त असून त्यांचाच कित्ता आता मुख्यमंत्र्यांनीही गिरवायला सुरुवात केलीय, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय. 

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त पुरंदर तालुक्यातील जेऊर आणि बारामती तालुक्यातील मोरगाव इथं अजित पवार यांच्या प्रचार सभा झाल्या. त्यावेळी अजित पवारांनी भाजप नेत्यांसह पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. आता असलेल्या सरकारमध्येच प्रचंड मतभेद असल्यानं त्यांच्यातच मेळ राहिला नाही, असं अजित पवार म्हणाले. 

आत्ताच्या सरकारनं गोहत्या बंदीचा निर्णय घेतलाय. मात्र अन्य मांसाहारही बंद करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील लोक अन्य राज्यात जावून राहतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसंच येणाऱ्या काळात बैलांऐवजी टॅक्टरगाडी पाहायला मिळेल असंही त्यांनी सांगितलं. भाजपच्या नेत्यांचा तोल आता घसरू लागलाय, त्यामुळं त्यांना वेड लागलंय की काय असा प्रश्न निर्माण होतो असंही ते म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.