वसई : वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, नालासोपारा, वसई शहरात रोड शो केला. वसई विरार शहरातल्या पाणी प्रश्नावर यावेळी बोट ठेवण्यात आलं.
निवडणुकीत महायुतीला पन्नासहून जास्ता जागा मिळतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. केंद्र आणि राज्यातील युती सरकारच्या माध्यमातून वसई विरारकरांना मुलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. तसंच केवळ गुंडगिरीच्या जोरावर अनेक वर्षं सत्ता गाजवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी, महायुती पुर्ण ताकदीनिशी उतरली असल्याचं यावेळी आदित्य यांनी सांगितलं.
दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सेना-भाजपनं प्रसिद्ध केलेल्या वचनामान्य बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी टीकास्त्र सोडलंय.
आघाडीच्या कामांचा पुनरुच्चार करून सेना भाजप मत मागत असल्याचं क्षितीज ठाकूर यांनी म्हटलंय. निवडणुकीसाठी महायुती आहे की नाही हे लोकांना माहितच नाही असंही क्षितीज ठाकूर यांनी म्हटलंय. अनेक वॉर्डात सेना-भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, त्यामुळे युती अस्तित्वात नसल्याचा क्षितीज ठाकूर यांनी केलाय.
तिकडे रामदास कदम यांनी वसई-विरारमध्ये खालच्या भाषेत टीका करू, नये असा खोचक सल्ला आमदार विलास तरेंनी दिलाय.
वसईतल्या एका सुपारी प्रकरणात रामदास कदमांना हितेंद्र ठाकूर यांनी केलेली मदत कदमांनी विसरू नये असंही तरेंनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.