कोकणात मान्सून रेंगाळला

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून सध्या तिथंच रेंगाळलाय. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाला. दरम्यान, गोव्यात मान्सून सक्रिय झालाय.

Updated: Jun 12, 2015, 09:59 AM IST
कोकणात मान्सून रेंगाळला title=

रत्नागिरी : दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून सध्या तिथंच रेंगाळलाय. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाला. दरम्यान, गोव्यात मान्सून सक्रिय झालाय.

मात्र तो उत्तरेकडं सरकण्याची सकारात्मक स्थिती अजून निर्माण झाली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस जावे लागतील, अशी माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय. 

मात्र राज्याला मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा दिलाय. तर अशोबा वादळ ओमानला पोहोचण्याची शक्यता असल्यानं, अरबी समुद्रातली वा-याची स्थिती पूर्ववत होईल, अशी आशा हवामानतज्ज्ञ बाळगून आहेत. 

मुंबईत काल रात्री मान्सूनपूर्व पाऊस मुंबईत ठिकठिकाणी बरसला. या पहिल्याच पावसात, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. दरम्यान, मुंबई उपनगरात चांगला पाऊस झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.