उजनीत जिलेटीनने ४० बोटी उडविल्या, २ कोटींचे साहित्य उद्धवस्त

उजनीत जिलेटीनने ४० बोटी उडवून २ कोटींचे साहित्य उद्धवस्त केले.

Updated: Jan 22, 2016, 03:35 PM IST
उजनीत जिलेटीनने ४० बोटी उडविल्या, २ कोटींचे साहित्य उद्धवस्त title=

बारामती, पुणे : राज्यात वाळू माफियांची दिवसागणिक दादागिरी वाढत आहे. याला काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त आहे. मात्र, ही दादागिरी बारामतीत प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी मोठीत काढलेय. उजनीत जिलेटीनने ४० बोटी उडवून २ कोटींचे साहित्य उद्धवस्त केले.

 ही राज्यातील वाळू माफियांवर सर्वाधिक मोठी कारवाई आहे. उजनीतील वाळू माफियांचे महसूल विभागाने कंबरडे मोडले आहे.  इंदापुर तालुक्यातील पळसदेव डाळज भागात ४० बोटी जिलेटीन लावुन उडविल्यात.

तर वाळू माफियांची २ कोटींची साहित्य उद्वस्त करण्यात आले आहे. ही कारवाई बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी केली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.