नाशिक : नाशकात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचं चित्र दिसतंय. गेल्या दोन दिवसांत दोन जणांचे खून झाले आहेत.
पंचवटीतल्या फुलेनगर परिसरात शौचालयाला जाण्याच्या किरकोळ कारवणावरून योगेश कुयटे या तरुणाचा धारधार शस्त्रानं भोसकून खून केला. मोठ्या भावासोबत शेजाऱ्याचं भांडण सुरू होतं. ते सोडवण्यासाठी योगेश गेला असता त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. यात तो जागीच ठार झाला.
याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलीय. अत्यंत क्षुल्लक कारणावरून शहरात दिवसा-ढवळ्या खुनाच्या घटना घडत असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास २७ जणांच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. ऐन कुंभमेळा तोंडावर असताना शहरात पोलिसांचा धाकच राहिला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.