मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक विस्कळीत

 मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची बातमी येतेय. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झालीय. 

Updated: Nov 3, 2015, 11:41 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक विस्कळीत title=
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची बातमी येतेय. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झालीय.
 
खोपोली फूड मॉ़लजवळच हा अपघात झाल्याचं समजतंय. एक सिमेंट ट्रक आणि कंटेनरमध्ये हा अपघात झालाय. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.
 
सकाळी नऊ ते साडे नऊच्या सुमारास हा अपघात झालाय. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका सिमेंटच्या ट्रकला मागून आलेल्या कंटेरनरनं धडक दिली. या धड़केमुळे ट्रकमध्ये भरलेल्या सिमेंटच्या गोण्या उडून रस्त्यावर पडल्यात. 
 
या अपघातामुळे पुणे - मुंबई रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झालीय. पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या तीन लेन बंद करण्यात आल्यात तर केवळ एकाच लेनमधून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्राफिक जॅमचा सामना करावा लागतोय. या रस्त्यावर ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसताय.  
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.