माळशेज घाटात दुधाचा टॅंकर कोसळून २ ठार, ७ जखमी

येथील घाटात दुधाच्या टँकरला भीषण अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील मड येथून निघालेला दुधाचा टॅंकर माळशेज घाटात कोसळून २ ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत.

Updated: Jan 27, 2016, 05:39 PM IST
माळशेज घाटात दुधाचा टॅंकर कोसळून २ ठार, ७ जखमी  title=

माळशेज : येथील घाटात दुधाच्या टँकरला भीषण अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील मड येथून निघालेला दुधाचा टॅंकर माळशेज घाटात कोसळून २ ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत.

माळशेजमधल्या घाट वळणावर दुधाचा टँकर दरीत कोसळून ही दुर्घटना घडली. मुरबाड, शहापूर तालुक्याच्या दिशेने परतणारा एक टँकर माळशेज घाटात रस्त्यावरून खाली गेल्याने पलटी झाला. 

घोडेगावला कामाला आलेले काही कामगार टँकरमधून घरी परतत होते. कल्याणच्या दिशेने जात असताना माळशेज घाटातील आंबा कॉर्नरजवळ टँकर कोसळला. 
 
सर्व जखमी व्यक्तींना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाजी बोंद्रे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही. 

जखमींची नावे
हेमंत तुकाराम पारधी, काळू पारधी, परशू अनंत बला (३), संगीता अनंत बला, अनंत लवटू बला (सर्व राहणार- फांगूळ गव्हाण मोरोशी), लक्ष्मण खंडू करवाळे (कुणगे शेलगाव), उषा दत्तात्रेय ठाकरे, मंदा लक्ष्मण करवाळे, काळू चौधरी, ताराबाई मुरेकर (सर्व राहणार- गुंदे शेलगाव)