जळगाव : उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी ३० रुपयांची लाच स्विकारताना साकळीचे तलाठी प्रतापसिंग बाबूसिंग राजपूर (५७) यांना जळगाव येथील लाचलूचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली.
तक्रार करणाऱ्या तरुणाला नोकरीसाठी नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट हवे होते. त्यासाठी त्याला वडिलांच्या उत्पन्नाचा दाखला हवा होता. त्यासाठी त्यांने आपल्या तीन मित्रांसह यावल तालुक्यातील साकळी तलाठी कार्यालयात रितसर अर्ज केला. हा दाखला देण्यासाठी तलाठी राजपूत यांनी प्रत्येकी १०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर या तरुणाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ३० रुपयांची लाच घेताना ते रंगेहात पकडले गेले.
यापूर्वीही राजपूत यांनी २००६मध्ये खिर्डी, रावेर येथे ४०० रुपयांची लाच घेतली होती. त्यावेळी त्यांना पकडण्यात आले होते. याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.