कडाक्याच्या थंडीत सापडली फडक्यात गुंडाळलेली तान्हुली!

भिवंडी तालुक्यातल्या धामणगाव इथं हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आलीय. कडाक्याच्या थंडीत एका फडक्यात गुंडालेलं एक तान्हुलं बेवारस अवस्थेत सापडलंय. अवघ्या १० ते १२ दिवसांचं हे तान्हुलं आहे. 

Updated: Jan 21, 2016, 10:57 AM IST
कडाक्याच्या थंडीत सापडली फडक्यात गुंडाळलेली तान्हुली!  title=

भिवंडी : भिवंडी तालुक्यातल्या धामणगाव इथं हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आलीय. कडाक्याच्या थंडीत एका फडक्यात गुंडालेलं एक तान्हुलं बेवारस अवस्थेत सापडलंय. अवघ्या १० ते १२ दिवसांचं हे तान्हुलं आहे. 

धामणगाव नाक्यावरच्या एका बंद पडलेल्या दवाखान्याच्या पायरीवर या तान्हुल्या मुलीला वेबारस अवस्थेत सोडून देण्यात आलं होतं. 

स्वप्निल भोईर यांनी कडाक्याच्या थंडीत बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या दिशेने ते गेले असता त्यांना हे बाळ पायरीवर ठेवलेलं दिसलं. त्यांनी तात्काळ डॉ. प्रमोद भोईर यांच्या मदतीनं या बाळाला रुग्णालयात दाखल केलं असून बाळाची प्रकृती चांगली आहे.

ही मुलगी असल्यानं तिला तिच्या आई-वडीलांनी तिला असं वाऱ्यावर सोडलं असावं का? अशी चर्चा धामणगाववासियांमध्ये आहे.

या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात अज्ञान आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.