नाशिकमध्ये दुसऱ्यांदा दुचाकी जाळण्याचा प्रकार

येथील सिडको परिसरामध्ये सलग दुसऱ्यांदा दुचाकी जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. नाशिकच्या सिडको परिसरातील निलांजली निल अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. 

Updated: May 14, 2016, 12:41 PM IST
नाशिकमध्ये दुसऱ्यांदा दुचाकी जाळण्याचा प्रकार title=

नाशिक : येथील सिडको परिसरामध्ये सलग दुसऱ्यांदा दुचाकी जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. नाशिकच्या सिडको परिसरातील निलांजली निल अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. 

यामध्ये एकूण ६ दुचाकी जाळण्यात आल्या आहेत आणि या जळीतकांडामुऴे नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. या आधी ११ मे लाही नाशिकच्या सिडकोच्याच महालक्ष्मीनगर परिसरातील श्री अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ६ गाड्या अज्ञात समाजकंटकांनी जाळल्या होत्या. 

या गाड्याही मध्यरात्रीच्या सुमारास जाळण्यात आल्या होत्या... या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. असं असताना आज पुन्हा नाशिकमधील सिडको परिसरातच निलांजली निल अपार्टमेंटमध्ये ६ दुचाकी जाळण्यात आल्यात. या जळीतकांडामुळे नाशिकमधील दुचाकी मालक दहशतीखाली आहेत.