प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर : सरकारी विहिरी चोरल्याचे प्रसंग आपण रुपेरी पडद्यावर, प्रत्यक्ष जीवनात ऐकले असतील मात्र गुहागरमध्ये तर एक नव्हे दोन नव्हे तर चक्क सहा बंधारे चोरीला गेलेत.
त्रिशूळ साखरी... डोंगराळ भागात वसलेलं एक गाव.... गावात सतत पाणीटंचाई...पाण्याचा कायमचा प्रश्न मिटावा यासाठी पाणलोट विभागाकडून पक्क्या स्वरुपाचा मोठा बंधारा बांधण्याचं काम सुरूय. मात्र काही ठराविक ठेकेदारांनी जुन्या बंधाऱ्याचे दगड उचलून नेल्यामुळं पाणी प्रश्न गंभीर बनलाय... यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करुनही कुठलीच दाद मिळत नसल्याचं ग्रामस्थ सांगतात.
तर जुन्या बंधाऱ्याचेच दगड नवीन बंधाऱ्यासाठी वापरण्याच्या सूचना सरपंचांनी दिल्याचं ठेकेदार सांगतोय. यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रार देऊनही त्रिशुळ साखरीचे तलाठी कारवाई करण्याऐवजी कानावर हात ठेवतायत.
खरं तर बंधाऱ्यांमुळे गावाचा पाणीप्रश्न सुटत होता. परंतु चोरीच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा गावाचा पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.