सोलापूर प्राणी संग्रहालयातून मगरीची सात पिल्लं गायब

सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातून मगरीची आठपैकी सात पिल्लं अचानक गायब झाल्यानं खळबळ उडालीय. मंगळवारीच प्राणी संग्रहालयात या आठ पिल्लांचा जन्म झाला होता. मात्र रविवारच्या पाहणीत ही पिल्लं गायब असल्याचं समोर आलं. 

Updated: Jun 9, 2015, 11:05 PM IST
सोलापूर प्राणी संग्रहालयातून मगरीची सात पिल्लं गायब title=

संजय पवार, झी मीडिया, सोलापूर: सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातून मगरीची आठपैकी सात पिल्लं अचानक गायब झाल्यानं खळबळ उडालीय. मंगळवारीच प्राणी संग्रहालयात या आठ पिल्लांचा जन्म झाला होता. मात्र रविवारच्या पाहणीत ही पिल्लं गायब असल्याचं समोर आलं. 

महापालिकेच्या कामगारांनीच ही पिल्लं गायब केल्याचा संशय इथल्याच कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केलाय. हा प्रकार महापालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली. तर मगरीची पिल्लं शोधण्याऐवजी मगरी जमिनीत असतील, दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवलंय... अशी उत्तरं देण्यात उद्यान विभाग प्रमुख धन्यता मानतायेत. 

तर हा प्रकार आयुक्तांना कळताच त्यांनी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन चौकशी समिती नेमलीय. प्राणी संग्रहालयातून याआधीही मोठ्या मगरी गायब झाल्या होत्या. त्यातल्या दोन मगरी अद्यापही सापडलेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा मगरी सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.