दारुच्या नशेत उकळत्या दुधाची कढई अंगावर घेतली; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

कानपूरच्या बाबू पुरवा परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दारुच्या नशेत एक व्यक्ती दुधाच्या गरम कढईत पडला आणि त्याचा मृत्यू झाला.   

शिवराज यादव | Updated: Nov 10, 2024, 08:02 PM IST
दारुच्या नशेत उकळत्या दुधाची कढई अंगावर घेतली; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल title=

मद्यपान करणं जिवाला हानीकारक असतं याची कल्पना असतानाही अनेकजण दारुच्या नशेत बुडालेले असतात. एक तर दारुमुळे शरिराला होणारी हानी किंवा मग दारुमुळे होणारा अपघात किंवा इतर गोष्टींमुळे कित्येक जण जीव गमावतात. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. कानपूरमधील बाबू पुरवा परिसरात शनिवारी रात्री एक व्यक्ती दारुच्या नशेत दूध गरम केल्या जाणाऱ्या कढईवर जाऊन पडला. गरम दूध अंगावर पडल्याने तो होरपळला आणि मृत्यू झाला. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

कानपूरच्या किदवई नगरच्या चौकात हरी ओम स्वीट्स नावाचं एक दुकान आहे. या दुकानातील कर्मचारी कढईत दूध गरम करत होते. यावेळी सुमेरपूरच्या हमीरपूर येथील रहिवासी मनोज कुमार तिथे आला. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, तो पूर्णपणे दारुच्या नशेत होता. तेथील कर्मचारी त्याला रोखत असतानाही तो ऐकत नाही आणि पुढे जातो. शुद्धीत नसल्याने त्याला कढईत दूध गमर केलं जात असल्याची कोणताही कल्पना नव्हती. नशेत तो एक कढईजवळ जातो. यावेळी धक्का लागल्याने कढई उलटते आणि सगळं गरम दूध त्याच्या अंगावर पडतं. व्हिडीओत अंगावर गरम दूध प़डल्यानंतर तो तडफडताना दिसत आहे.

मनोज कुमार गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी मनोजला रुग्णालयात दाखल केलं. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत मनोज कुमारच्या आईने सांगितलं की, मुलगा कानपूरमध्ये एकटा राहतो आणि शनिवारी रात्री दुकानावर नाश्ता करण्यासाठी गेला होता. त्याच्यावर गरम दुधाची कढई कशी पडले हे मला माहिती नाही. सकाळी पोलिसांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. 

दरम्यान दुकान मालक जितेंद्र साहू यांचं म्हणणं होतं की, तो संध्याकाळपासूनच दारुच्या नशेत होता. तो दोन वेळा दुकानाकडे आला होता, पण आम्ही त्याला पळवून लावलं. काही वेळाने तो परत आला होता. त्यावेळी आम्ही कामात व्यग्र होतो. त्याने कढईवर हात मारला, त्यामुळे ती पडली. यानंतर आम्ही त्याच्या अंगावर पाणी टाकून पोलिसांना कळवलं. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून त्याला नेलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.