Exclusive: राज ठाकरेंनी सांगितली शिंदेंच्या बंडाची Inside Story! 'कोरोना आला नसता तर...'

Raj Thackeray Interview: शिंदेंनी बंड कसं केलं याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र आता पहिल्यांदाच राज ठाकरेंनी याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 10, 2024, 08:59 PM IST
Exclusive: राज ठाकरेंनी सांगितली शिंदेंच्या बंडाची Inside Story! 'कोरोना आला नसता तर...' title=
राज ठाकरे

Raj Thackeray Interview: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण, योजना, विधानसभा निकाल, उद्धव ठाकरे या सर्वांवर भाष्य केले. आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, तेव्हा तीच माणसं जर निवडून आली तर आमचं कोणी वाकडं करु शकत नाही, हे त्यांच्या मनात दृढ होईल. मतदारांची प्रतारणा होईल. पण या सर्वाला पर्याय हवाय. मला महाराष्ट्राची चिंता आहे. एखादा पक्ष संपला तरी चालेल पण महाराष्ट्र संपला नाही पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत मोठा खुलासा केला. 

राज ठाकरेंकडून मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आजही अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. शिंदेंनी बंड कसं केलं याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र आता पहिल्यांदाच राज ठाकरेंनी याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय. कोरोना आला नसता तर शिंदेंनी 2019 सालीच बंड केलं असतं, असा दावा राज ठाकरेंनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत राज ठाकरेंनी हा गौप्यस्फोट केलाय. 

Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?

शिंदेंच्या बंडाची इनसाईड स्टोरी 

एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेची दोन शकलं झाली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मोठा भूकंप झाला. मात्र अजूनही शिंदेंच्या बंडाबाबत वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. आता राज ठाकरेंनी शिंदेंच्या बंडाची इनसाईड स्टोरी सांगितली. एकनाथ शिंदे यांचं बंड हे अडीच वर्ष आधीच झालं असतं. लॉकडाऊनमुळे शिंदेंचं बंड अडीच वर्ष लांबलं, असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केलाय. 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत राज ठाकरेंनी हा मोठा दावा केलाय. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंचं भाजपसोबत जाणं योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

राज ठाकरेंच्या यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी दुजोरा दिलाय. राज ठाकरे यांनी सत्य परिस्थिती सांगितली आहे.  लॉकडाऊन लागलं नसतं तर 2019 मध्ये शिंदे यांनी बंड केलं असतं असं शेवाळे यांनी स्पष्ट केलंय. 

 काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती

शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या पक्षफुटीनंतर राज्याचं राजकारण झपाट्यानं बदललं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीसाठी भाजपसोबतची नैसर्गिक युती तोडली.आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली, असा आरोप शिवसेना शिंदे पक्षाकडून केला जातो. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि शिवसेना आम्ही वाचवली, असा दावा शिंदे पक्षाकडून केला जातो. मात्र आता राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला योग्य ठरवलं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शिंदेंचं कौतुक केलंय. त्यामुळे याचे अनेक राजकीय अर्थ निघणार हेही तितकंच खरंय.

'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं