सोलापूर : आहेरवाडीतल्या एनटीपीसीच्या प्रकल्पात घडलेल्या दुर्घटनेत तीन कामगार ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकल्पातलं लोखंडी स्ट्रक्चर दोरखंडाच्या सहाय्यानं उचलत असताना अचानक दोरखंड तुटला आणि स्ट्रक्चर कामगारांच्या अंगावल कोसळले. यात 11 कामगार दबले गेलेत. यातल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर आठ कामगार गंभीर जखमी झाले. तब्बल 32 कामगार या ठिकाणी काम करत होते.
जखमींना सोलापूरच्या यशोधर आणि अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.