आधी पार्किंग, नंतरच बांधकामाला परवागी ! बिल्डर प्रकरणी नवी मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाचा दणका

नवी मुंबईत पार्किंगविना फ्लॅट देण्यास परवानगी नाही, असे सांगत प्रत्येक फ्लॅटमागे पार्किंग देण बिल्डरांना बंधनकारक आहे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने

Updated: Oct 7, 2016, 06:06 PM IST
आधी पार्किंग, नंतरच बांधकामाला परवागी ! बिल्डर प्रकरणी नवी मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाचा दणका  title=

मुंबई : नवी मुंबईत पार्किंगविना फ्लॅट देण्यास परवानगी नाही, असे सांगत प्रत्येक फ्लॅटमागे पार्किंग देण बिल्डरांना बंधनकारक आहे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने
नवी मुंबई महापालिकेला आदेश दिला आहे.

नवी मुंबईतील ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यावर उपाय म्हणून आधी पार्किंगची योग्य व्यवस्था करा, असे आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने आज नवी मुंबई महापालिकेला आदेश देताना म्हटले. यापुढे कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी देताना बिल्डरांना प्रत्येक फ्लॅटमागे किमान एक पार्किंग देण बंधनकारक करा, अन्यथा त्यांना बांधाकामाची परवानगी देऊ नका, अशी तंबी दिली.

मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि एम एस सोनाक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. पार्किंगसाठी जागा नसल्याने लोक रस्ते आणि फुटपाथसारख्या सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करतात. ज्याचा फटका ट्राफिकला बसतो. वारंवार तक्रार आणि निर्देश देऊनही नवी मुंबई महापालिकेने यावर काहीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ज्यावर 'एक फ्लॅट एक पार्किंग' हा नियम सक्तीचा करूनचं नवीन बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत.