नरबळी देण्यासाठी लातूरमध्ये तरुणाचं अपहरण

लातूर शहरातील रामनगर भागातील विक्रम मुरलीधर पांचाळ १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आलंय. पाऊस पडत नसल्यामुळे नरबळी देण्यासाठी आपले अपहरण केल्याचा एसएमएस स्वतः विक्रमने आपल्या कुटुंबियांना केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

Updated: Jan 31, 2016, 12:22 PM IST
नरबळी देण्यासाठी लातूरमध्ये तरुणाचं अपहरण title=

लातूर : लातूर शहरातील रामनगर भागातील विक्रम मुरलीधर पांचाळ १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आलंय. पाऊस पडत नसल्यामुळे नरबळी देण्यासाठी आपले अपहरण केल्याचा एसएमएस स्वतः विक्रमने आपल्या कुटुंबियांना केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूर जिल्ह्यातील नागरिक पाण्यासाठी मोठी पायपीट करतायत तर दुसरीकडे पाऊस पडत नसल्यामुळे नरबळी देण्यासाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील रामनगर भागात राहणाऱ्या विक्रम मुरलीधर पांचाळ या १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आलाय. 

विक्रमने अपहरणानंतर स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या कुटुंबियांना एसएमएस पाठवत सांगितलय की पाण्यासाठी आपला नरबळी दिला जाणार असून त्यासाठीच आपलं अपहरण करण्यात आलय. विक्रमनं पाठवलेल्या या मेसेजमुळे मोठी खळबळ उडालीय. २९ जानेवारीला दुपारी विक्रमचं अपहरण झाल्यानंतर दुपारी ०२ वाजून ३६ मिनिटांनी हा एसएमएस विक्रमने आपले मामा ओमप्रकाश अलमलेकर यांना केलाय. 

ज्यात तो लिहितोय '' मी विक्रम आहे. मला प्रसाद सागर याने धोक्याने पकडलं आहे. मला बाभळगावकडे आणलं आहे आणि उद्या पहाटे पाऊस पडावा म्हणून बळी द्यायचा म्हणत आहेत. आता लगेच कुणालातरी पाठवा बाभळगावमध्ये..." विक्रम पांचाळ याच्या कुटुंबीयांनी लातूर ग्रामीण पोलिसात या प्रकरणी तक्रार देवून मोबाईलवरील मेसेजही दाखवलाय. 

दरम्यान लातूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी सध्या तरी हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.