मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा पुलावर आज पहाटे ४ वाजता एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे.

Updated: Jan 31, 2016, 08:48 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी title=

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा पुलावर आज पहाटे ४ वाजता एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे.

अपघात ज्या पुलावर झाला आहे तो अरुंद असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

पनवेल बाजूची रांग पक्षी अभ्यारण्यापर्यंत पोहोचली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून कोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत