उष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळलेत. 

Updated: May 24, 2016, 03:55 PM IST
उष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू  title=

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळलेत. 

या मोरांचा उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्मघातानं मृत्यु झालाय. परिसरात काल तपमान ४७ अंश असल्याने प्रचंड उष्मा जाणवत होता. 

नामदेव पाटील आणि शिवराम पाटील यांच्या शेतात हे मोर मृतावस्थेत आढ़ळले. इतकंच नाही तर याच शेतात ४ डोम कावळे, २ तितुर पक्षीही मृतावस्थेत आढळलेत. 

या पक्षांचा मृत्यु उष्मघातांने तसच अन्नपानी न मिळाल्याने झाल्याच शवविच्छदनात निष्पन्न झाल्याच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संगितलं.