दिवाळीत पुणे-नागपूर दरम्यान १० सुपरफास्ट एक्सप्रेस

दिवाळीच्या काळात रेल्वेनं पुणे आणि नागपूर दरम्यान 10 सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेनं जाहीर केलाय. 

Updated: Oct 18, 2016, 05:45 PM IST
दिवाळीत पुणे-नागपूर दरम्यान १० सुपरफास्ट एक्सप्रेस  title=

मुंबई : दिवाळीच्या काळात रेल्वेनं पुणे आणि नागपूर दरम्यान 10 सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेनं जाहीर केलाय. 

18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ही हॉलिडे स्पेशल गाडी अजनी स्टेशनवरून रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल. तर पुण्याला दुसऱ्या दिवशी पावणे बारा वाजता पोहचेल. 

वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, आणि दौंड मार्गे पुण्याला पोहचेल. गाड़ीला फर्स्ट एसी 1, सेकेंड एसी चार आणि थर्ड एसीचे नऊ डबे असणार आहेत.