ऑडिट औरंगाबाद जिल्ह्याचं

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ असून त्यातील 3 विधानसभा मतदारसंघात काँग्रसचे आमदार आहेत, तर शिवसेनेच्या ताब्यात 2 विधानसभा मतदारसंघ आहेत.

Updated: Oct 7, 2014, 09:36 PM IST
 title=

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ असून त्यातील 3 विधानसभा मतदारसंघात काँग्रसचे आमदार आहेत, तर शिवसेनेच्या ताब्यात 2 विधानसभा मतदारसंघ आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडं प्रत्येकी एक - एक विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच 2 विधानसभा मतदारसंघ अपक्षांच्या ताब्यात आहे.

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व प्रदीप जैस्वाल (49965) करत आहेत. ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि आता शिवसेनेत आहेत.

औरंगाबाद पूर्व मतदरासंघाचं प्रतिनिधीत्व काँग्रेसचे वजनदार नेते राजेंद्र दर्डा( 480197) करत आहेत.

औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाठ आमदार आहेत.

औरगांबाद पश्चिम राखीव मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व शिवसेनेचे संजय पांडुरंग शिरसाट( ५७ हजार ९२२) करत आहेत.

वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आर.एम.वाणी ( 51379 मते ) गेली तीन टर्म आमदार आहेत.

कन्नड विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर हर्षवर्धन जाधव ( 46106) विजय झाले मात्र आता ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. 

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातचं प्रतिनिधीत्व कँबिनेट मंत्री अब्दुल सत्तार (97940) करत आहेत.

गंगापूर विधानसभा मतदासंघातून प्रशांत बंब (53046) हे अपक्ष आमदार आहेत.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कल्याण काळे (63236) हे आमदार आहेत. 

पैठण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजय वाघचौरै (64179) आमदार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.