शुभा राऊळ मनसेकडून लढवणार विधानसभा निवडणूक?

 दहिसरमधून घोसाळकरांना तिकीट मिळाल्यानं नाराज असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी मनसेची वाट धरलीय. 

Updated: Sep 26, 2014, 11:52 PM IST
शुभा राऊळ मनसेकडून लढवणार विधानसभा निवडणूक? title=

मुंबई :  दहिसरमधून घोसाळकरांना तिकीट मिळाल्यानं नाराज असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी मनसेची वाट धरलीय. 

शुभा राऊळ थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन त्यांची भेट घेणार आहेत... अशी माहिती मनसे नेते प्रवीण दरेकर यांनी दिलीय. त्यामुळे, पक्षावर नाराज असलेल्या शुभा राऊळ आता मनसेत जाणार का? याची उत्सुकता लागलीय.

शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्याच नगरसेविकांच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप शुभा राऊळ यांनी केली होती. पक्षाच्या नेतृत्वानंही त्यांच्या या कैफियतीकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. तेव्हापासून त्या नाराज असल्याचं सांगितलं जातंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.