शिवसेना विरोधात बसणार, शपथविधीला उद्धव जाणार नाहीत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उद्या होणाऱ्या शपथविधीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय. 

Updated: Oct 30, 2014, 05:28 PM IST
शिवसेना विरोधात बसणार, शपथविधीला उद्धव जाणार नाहीत   title=

मुंबई: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उद्या होणाऱ्या शपथविधीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय. 

उद्या फक्त भाजपाच्या नेत्यांचा शपथविधी होणार, असं भाजपचे ज्येष्ठ नेते राजीव प्रताप रूडी यांनी ट्विट करून स्पष्ट केलंय. मात्र भविष्यातील शिवसेनेसोबतच्या युतीबाबत चर्चा सुरू असल्याचंही राजीव प्रताप रूडी यांनी सांगितलं.

Talks with Shiv Sena going on very amicably. No outcome yet. Seems unlikely Shiv Sena will be part of government as of now.

— Rajiv Pratap Rudy (@RajivPratapRudy) October 30, 2014

 

शिवसेनेची ऑफर - 

  • एकूण 14 मंत्रीपदं मिळावित शिवसेनेचा प्रस्ताव
  • शिवसेनेला किमान 7 कॅबिनेट मंत्रीपदं हवीत
  • किमान दोघांचा 31 ऑक्टोबरला शपथविधी व्हावा

शिवसेना नेत्यांच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली होती. भाजप नेत्यांबरोबर चर्चा सुरू असून सरकारमधील सहभागाबाबत उद्या म्हणजे आज निर्णय जाहीर करणार असल्याचं शिवसेना नेत्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं आज आपली भूमिका शिवसेना कशाप्रकारे जाहीर करते, हे पाहावं लागेल. तत्पूर्वी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना विरोधी पक्षात बसण्याची शक्यता जास्त आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.